रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2017 (11:46 IST)

सौंदर्याने घेतला घटस्फोट

सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी कन्या सौंदर्याचा अखेर घटस्फोट झाला आहे. बिझनेसमन पती अश्विन रामकुमारपासून काडीमोड घेण्यासाठी सौंदर्याने डिसेंबर 2016 मध्ये फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. गेल्या सात महिन्यांपासून दोघंही वेगळे राहत होते. दोघांनी जुळवून घेण्याची तयारी न दर्शवल्यामुळे अखेर कोर्टाने त्यांना घटस्फोट मंजूर केला आहे. सौंदर्या-अश्विन यांना वेद हा दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या कस्टडीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. सौंदर्या आणि अश्विन रामकुमार यांनी 2010 मध्ये एका भव्य सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती.