गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बॉबी देओलच्या गुप्त या चित्रपटाचे सीक्वल येणार

युद्ध, त्रिदेव, विश्वात्मा, मोहरा आणि गुप्त सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे राजीव रॉय खूप दिवसापासून सक्रिय नसून परदेशात राहत होते. आता ते पुन्हा जोशमध्ये आले असून सिनेमा डायरेक्ट करण्याचा विचार करत आहे. 
 
राजीव रॉय एक थ्रिलर सिनेमा प्लान करत आहे. आयडिया त्याच्या मनात असून स्क्रिप्ट तयार आहे आणि लवकरच ते घोषणा करतील. 
 
खरं म्हणजे राजीव गुप्त सीक्वल प्लान करत आहे. गुप्तची कहाणी पुढे वाढवण्यासारखी तर नाही परंतू सिनेमात कारण सिनेमात काजोलने अभिनित केलेलं पात्र मरण पावतं. म्हणून गुप्तचा दुसरा भाग नवीन कलाकार, भूमिका आणि कहाणीसह समोर येईल. यात देखील त्याच प्रकारे रोमांच, गूढ आणि संगीत असेल.
 
उल्लेखनीय आहे की गुप्त या चित्रपटात बॉबी देओल, काजोल आणि मनीषा कोईराला या कलाकारांनी भूमिका बजावल्या होत्या आणि याचे संगीत सुपरहिट झाले होते. आता नवीन चित्रपटात कोण असेल हे बघणे मनोरंजक ठरेल.