सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 फेब्रुवारी 2019 (20:45 IST)

रणवीर सिंहची 'गली बॉय' हिट, 200 कोटीचा गल्ला

रणवीर सिंह हिट वर हिट सिनेमा देत आहे. 2018 मध्ये पद्मावत आणि सिम्बा यांचे हे चित्रपट सुपर हिट होते. 2019 देखील त्याच्यासाठी यश घेऊन आला आहे. त्याची नुकतीच आलेली 'गली बॉय' देखील हिट मूव्ही ठरली. चित्रपटाकडून अपेक्षा तर जास्त होत्या, पण चित्रपटाचा विषय सर्वांना अपील करणारा नव्हता.
 
दुसर्या आठवड्यात 'गली बॉय' ने शुक्रवारी 3.90 कोटी, शनिवारी 7.05 कोटी, रविवारी 7.10 कोटी, सोमवारी 2.45 कोटी आणि मंगळवारी 2.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. भारतात, आतापर्यंत या चित्रपटाने 123.10 कोटी रूपये गोळा केले आहेत. वर्ल्ड वाइड ही आकडेवारी 200 कोटी पोहोचली आहे. चित्रपट आता हिट झाला असे म्हणायला मुळीच हरकत नाही. चित्रपट कमी बजेटमध्ये बनली आहे आणि त्याचे विविध राइट्स चांगल्या किंमतींवर विकले गेले आहे, त्यामुळे चित्रपट यशस्वी मानला जाऊ शकतो.
 
हा झोया अख्तरचा सर्वात यशस्वी चित्रपट बनला आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांनी या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. दोन्ही प्रसिद्ध कलाकार आहेत.