बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (11:59 IST)

अभिनेत्री रिटा भादुरी आजारी, मात्र चित्रीकरण सुरु

अभिनेत्री रिटा भादुरी  यांना किडनीचा आजार असून आता तो जास्तच बळावला आहे. ज्यामुळे त्यांना आता नियमित डायलिसीससाठी जावे लागते.

त्यामुळे रिटा यांचा प्रकृती नाजूक असल्याने सेटवरही चित्रीकरणातून मोकळा वेळ मिळताच त्या आराम करण्याला प्राधान्य देतात. ‘निमकी मुखिया’ या मालिकेच्या संपूर्ण टीमने या कठीण प्रसंगात रिटा यांना साथ दिली आहे. त्यांच्या डायलिसीसच्या वेळापत्रकानुसारच मालिकेच्या चित्रीकरणाचे वेळापत्रक ठरवण्यात येत आहे. जेणेकरुन सेटवर गरज नसल्यास त्या आराम करु शकतील.

आपल्या आजारपणाविषयी मी मुळीच विचार करत नाही. मला ते आवडतही नाही. त्यामुळेच मी स्वत:ला काहीतरी कामात गुंतवून ठेवते. सध्याच्या घडीला मालिकेच्या निमित्ताने मिळालेली टीम पाहता मी स्वत:ला खूप नशिबवान समजते. कारण, अशा व्यक्ती नेहमीच तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा देत असतात’असं त्या सांगतात.