गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (10:53 IST)

शाहरुख खान अशोका पुन्हा बनवण्यास उत्सुक

शाहरुख खानने अनेक चित्रपटांमधील ऍक्‍टिंगबरोबर काही चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. त्याला निर्मितीक्षेत्रामध्ये विशेष यश मिळालेले नाही, ही गोष्ट वेगळी. आगामी 2 वर्षांच्या काळात 9 ते 10 चित्रपटांची निर्मिती करण्याचा आपला मानस असल्याचे शाहरुखने अलिकडेच सांगितले. यातील सगळ्याच चित्रपटांमध्ये आपण स्वतः काम करणार नाही. मात्र व्यवसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकतील अशाच चित्रपटांची निर्मिती आपल्याला करायची आहे, असे शाहरुखने सांगितले.
 
त्याने तंत्रज्ञांची एक टीम उभी केली आहे. या टीमला बरोबर घेऊन स्वतःचाच “अशोका’ पुन्हा बनवायला आपल्याला नक्की आवडेल. बीएफएक्‍स तंत्रज्ञानाच्या आधारे हा नवीन “अशोका’ अधिक भव्य दिव्य आणि उच्च निर्मिती मूल्य असलेला बनवायला आपल्या आवडेल, असे शाहरुख म्हणाला. “अशोका’ बनवण्यासाठी 8 कोटी रुपये खर्च आला होता. म्नात्र त्यावेळी बीएफएक्‍ससारख्या तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला काहीच माहित नव्हते. हे तंत्र जर आज वापरले तर तेवढ्याच भांडवलामध्ये पूर्वीपेक्षाही अतिशय भव्यदिव्य आणि आकर्षक “अशोका’ बनवता येऊ शकेल. म्हणूनच आपल्याला “अशोका’ पुन्हा बनवायचा आहे, असे शाहरुख खान म्हणाला. तसे झाले तर कदाचित या नवीन “अशोका’ला तरी यश मिळू शकेल.