शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (17:30 IST)

पुढच्या ईदला सलमान घेऊन येणार ‘रेस ३”

ईद आणि सलमान खानचा चित्रपट हे दरवर्षी बॉक्सऑफिसवरील हीट समीकरण. यंदा ईदच्या दिवशी फारसा प्रभाव पाडू न शकणाऱ्या ट्युबलाईट मुळे चुकले. आगामी ईदला सलमान खान ‘रेस ३’  घेऊन येणार आहे. यात त्याच्या सोबतीला जॅकलीन फर्नांडीस दिसणार आहे.
 
सध्या सलमान खान ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करत आहे. पण ऑक्टोबर महिन्यापासून सलमान रेस ३ च्या शूटिंगला सुरूवात करेल. चित्रपटाचे निर्माते  रमेश तौराणी असून रेमो डिसुजा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून आतापर्यंत केवळ जॅकलीन आणि सलमान या केवळ दोन अभिनेत्यांची नावं घोषित करण्यात आली आहेत.
 
‘रेस 3’ या चित्रपटाचा मागील दोन भागाशी कोणताही संबंध नाही,असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ‘रेस 3’ बाबत लोकांच्या मनात उत्सुकता आहे. हा चित्रपटपुढील वर्षी  जून महिन्याच्या ईदमध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे.