1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (09:44 IST)

संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची जोडी पुन्हा दिसणार

Sanjay Dutt and Arshad Warsi will be reunited
अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची धमाकेदार जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अर्शद वारसी याने त्याचा आगमी चित्रपट ‘पागलपंती’च्या प्रमोशनवेळी याबाबत माहिती दिली. “संजू आणि मी पुढीलवर्षी येणाऱ्या एका चित्रपटात एकत्र काम करणार आहोत. प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद-फरहाद या चित्रपटाचे दिग्दर्शक करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित केलेली नाही.” अशी माहिती अर्शदने दिली.
 
या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगताना अर्शद असे म्हणाला की, “आमच्या पुढच्या चित्रपटात संजू एका अंध डॉनची भूमिका साकारत आहे. आणि त्याचा सहकारी आहे. विशेष म्हणजे संजूच्या अंधपणाबद्दल केवळ मलाच माहिती आहे. संपूर्ण चित्रपटात संजू माझ्या डोळ्यांनी जग पाहताना दिसेल. या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी आम्ही लवकरच युरोपमधील बुडापेस्ट येथे जाणार आहोत.”