यामुळे साराने मोडलं सुशांतसोबतचं नातं
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा अली खानने आपल्या आणि सुशांतसिंह राजपूतच्या नात्याबद्दल स्पष्ट सांगितले आहे. ती सुशांतला डेट करत असल्याचं तिने मान्य केले आणि ब्रेकअपचं कारण देखील सांगितलं.
बॉलिवूडशी संबंधित ड्रग्जच्या प्रकरणात चौकशीला सामोरा जात असताना साराने सुशांतशी ब्रेकअप का केलं याचं कारण सांगितलं. एका इंग्रजी वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार साराने सांगितले की या रिलेशनशिपमध्ये सुशांत एकनिष्ठ नव्हता. सूत्रांचा दाखला देत वेबसाइटप्रमाणे रिलेशनशिपमध्ये सुशांत फारच पझेसिव्ह होता आणि साराला तिच्या निर्मात्यांना सुशांतचं नाव सुचवण्यास सांगायचा.
सुशांतचा मित्र सॅम्युएल हाओकिपने नुकतीच एक पोस्ट शेअर करत सांगितले होते की सुशांत आणि सारा यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. सारा आणि सुशांतच्या ब्रेकअपनंतर रिया सुशांतच्या आयुष्यात आली. पण सुशांतचे सारासोबतचे संबंध फार चांगले होते. ते एकमेकांसोबत जास्त आनंदी होते.