गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 22 एप्रिल 2021 (11:52 IST)

आर्यनसह गौरी खान न्यूयॉर्कला रवाना, यूजर्स म्हणाले - 'देश अडचणीत आहे आणि हे पळून जात आहेत'

instagram
देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने 15 दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. राज्यात सध्या चित्रपट आणि टीव्हीचे शूटिंग बंद आहे. अशा परिस्थितीत अनेक स्टार्स मुंबई विमानतळावर दिसू लागले. काल रात्री शाहरुख खानची पत्नी गौरी खान मुलगा आर्यन खानसोबत विमानतळावर दिसली.
 
न्यूयॉर्कसाठी रवाना 
गौरी आणि आर्यन न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. तिची मुलगी सुहानासुद्धा तिथे शिकत आहे. यावेळी गौरीने प्रिंटेड मॅक्सी ड्रेस आणि ब्लॅक ब्लेझर घातला आहे. यासोबतच त्याने मॅचिंग मास्कदेखील लावला आहे. आर्यनने ब्लॅक टीशर्ट, डेनिम जॅकेट आणि पँट परिधान केले आहे. त्याने काळ्या रंगाचा मास्क देखील लावला आहे.
 
यूजर्सना केले ट्रोल 
सोशल मीडियावर गौरी आणि आर्यनची छायाचित्रे समोर येताच त्यांना ट्रोल केले जाऊ लागले. एका यूजरने लिहिले - "प्रत्येकजण देश सोडून जात आहे." दुसऱ्याने लिहिले, "खरोखर? इस्पितळात जा आणि खरी परिस्थिती पहा, सर्वच सोयी सुविधा असलेले हे लोक आहेत. ”एक यूजर लिहितो की“ हे लोक इतके महत्त्वाचे आहेत का? देशातील फ्रंटलाइन वॉरियर्स खर्या अर्थाने नायक आहेत जे आपल्या जीवाची पर्वा न करता मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका वापरकर्त्याने सांगितले, "हे पाहणे लाजिरवाणे आहे." दुसर्याने लिहिले - "सेलिब्रिटींना फक्त सुट्टीची आवश्यकता असते. अगदी अशा कठीण प्रसंगातही. ”एका वापरकर्त्याने सांगितले की“ संपूर्ण बॉलीवूड पळून जात आहे हे वाईट आहे. ते भारतापासून पळून जात आहेत. गरजू लोकांना पैसे न देता ते बाकी गोष्टींवर उडवत आहे.' '
 
हे स्टार्सही सुट्टीवर गेले आहे  
अनन्या पांडे आई आई भावना पांडेसमवेत विमानतळावर आली. यापूर्वी सारा अली खान, अमृता सिंग, दिशा पाटनी, टायगर श्रॉफ, आलिया भट्ट, रणबीर कपूरसुद्धा मुंबई सोडून सुट्टीवर गेले आहे.