शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (16:00 IST)

मिडियाच्या विरोधात शिल्पा शेट्टी मुंबई हायकोर्टात! उद्या सुनावणी

पती राज कुंद्राच्या अटकेमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीही सध्या चर्चेत आहे.तिच्याबद्दल अनेक बातम्या येत आहेत. त्याला तिने आक्षेप घेतला असून प्रसिद्धी माध्यमे खोटे रिपोर्टिंग करून आपली प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप केला आहे. त्याच्याविरोधात तिने मानहानीची केस उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.
 
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.यात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागत आहे. राज कुंद्राला अटक झाल्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीही चर्चेत आली आहे. तिच्याबाबतही अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत.मात्र याच्या विरोधात शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात २९ पत्रकार आणि प्रसिद्धी माध्यमांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. चुकीची माहिती देऊन आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तिने केला आहे.या खटल्याची सुनावणी उद्या मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.