गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (10:14 IST)

शिल्पा शेट्टीला आवडतात अश्लील व्हिडीओ’, ‘या’ अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात 19 जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहे.चौकशी दरम्यान नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने अभिनेत्री शर्लिन चोप्राची देखील चौकशी केली आहे.या चौकशी दरम्यान तिने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
 
अभिनेत्री शर्लिन चोप्राची 160 सीआरपीसी अंतर्गत तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने मोठा खुलासा केला आहे. शिल्पा शेट्टीला तिचे व्हिडीओ प्रचंड आवडत होते,असे शर्लिन चोप्राने सांगितले. मुंबई गुन्हे शाखेकडे जबाब नोंदवल्यानंतर तिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला पोलिसांनी केलेल्या चौकशीसंदर्भात प्रश्न विचारले.त्यावेळी तिने हा खुलासा केला आहे.
 
शर्लिन चोप्रा म्हणाली, शिल्पा शेट्टीला माझे व्हिडीओ आवडतात असं सागून माझी दिशाभूल करण्यात आली.राज माझा मेंटॉर होता.त्याने अनेक खोटी वचनं देऊन मला फसवलंय.जेव्हा तुम्ही शिल्पा शेट्टी सारख्या लोकांकडून प्रेरित होतात. तेव्हा तुम्हाला समजत नाही की काय बरोबर आहे आणि काय चूकीचं आहे.जेव्हा असे व्हिडिओ बनवल्याबद्दल माझे कौतुक झाले. तेव्हा मला असे आणखी व्हिडीओ करण्याची प्रेरणा मिळाली.मात्र शर्लिनचे हे आरोप शिल्पाने साफ फेटाळून लावले आहेत. तिला शर्लिनबद्दल काहीच माहित नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.