शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘शुभमंगल सावधान’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित

आता बॉलिवूडमध्येही ‘शुभमंगल सावधान’  शीर्षकाचा चित्रपट येतो आहे. हिट तमिळ विनोदी चित्रपट ‘कल्याण समयाल साधम’ याचा हा रिमेक आहे. ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटात पती-पत्नीची भूमिका साकारणाऱ्या आयुष्यमान आणि भूमी यांची केमिस्ट्री आता पुन्हा एकदा ‘शुभ मंगल सावधान’मधून रुपेरी पडद्यावर पाहावयास मिळणार आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

तमिळ दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांच्या ‘कलर यल्लो प्रॉडक्शन’अंतर्गत करण्यात येणार आहे. हा चित्रपट यावर्षी १ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.