बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

द्रौपदीच्या भूमिकेत सोनम

भारतीय सिनेमातील सर्वात मोठा चित्रपट बाहुबलीचे जगभरातील शानदार यश आणि त्यामुळे ऐतिहासिक कथांकडे लोकांचा वाढत चाललेला कल यामुळे बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरची नजर आता महाभारताच्या कथेवर आहे.
 
महाभारताच्या या कथेमध्ये दौप्रदीची भूमिका साकारण्याची सोनमची इच्छा आहे. सोनम महाभारताची ही कथा आधुनिक रंग-रूपात बनविणार आहे. त्याकरिता सिंगापूर स्थित लेखिका कृष्णा उदयशंकर यांची बेस्टसेलर श्रृंखला द आर्यवर्त क्रॉनिकल्सचे अधिकार घेण्यात आले आहेत. सध्या सोनम स्क्रिप्टरायटरकडून या पुस्कावर आधारित स्क्रिप्ट व सक्रीनप्ले लिहून घेत आहे. या पुस्तकावर एक नाही, तर तीन चित्रपट बनविण्याची सोनमची इच्छा आहे.
 
द आर्यवर्त क्रॉनिकल्सची कथा केवळ एका चित्रपटामध्ये संपविणे ठीक होणार नाही, असे सोनमला वाटते. चित्रपटाची कथा चांगल्या प्रकारे दाखविण्यासाठी ती तीन भागांमध्ये बनविली गेली पाहिजे, असे सोनमचे म्हणणे आहे.