कृष्णाने का वाचवली द्रौपदीची लाज...
दुर्योधनाने युधिष्ठिराला जुगार खेळण्यासाठी बोलावले. जुगारात युधिष्ठिर आपले सर्व राज्ये, धन, आपले भाऊ व आपल्या स्वत:ला पण हरला. जुगाराच्या धुंदीत युधिष्ठिर आपली राणी द्रौपदीला पणाला लावून हरला.
दुर्योधनाच्या सांगण्यावरून भाऊ दु:शासन द्रौपदीला सर्वांसमोर विवस्त्र करण्यासाठी तिची साडी ओढू लागला. जुगारात हरल्यामुळे पांडव बोलू शकत नव्हते. सभेत भीष्म, द्रोणाचार्य आणि विदुर सारखे न्यायाधीश आणि महान लोकही मान खाली करून बसलेले होते.
पण येथे प्रश्न पडतो की द्रौपदीची साडी वाढत कसी गेली. ती खेचताना साठ हजार हत्तींची ताकद असणारा दु:शासनदेखील दमला.
जेव्हा द्रौपदीने पाहिले की कोणी दु:शासनाला अडवणार नाही तेव्हा तिने डोळे बंद करून भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. ती म्हणाली हे गोविंद आज मला आस्था आणि अनास्थामधले जंग आहे. मला पहायचे आहे की ईश्वर आहे की नाही...
तेव्हा श्रीकृष्णाने असा काही चमत्कार केला की भगवंताच्या इच्छेने द्रौपदीची साडी वाढतच गेली. दु:शासन जसजशी साडी ओढत होता तस तश्या साड्या निघत होत्या. तेथे साड्यांचा डोंगरासारखा ढीग झाला. साडी ओढता ओढता दु:शासनाचे हात थकले, परंतु द्रौपदीची साडी मात्र होती तशीच राहिली.
पुढे वाचा साडी वाढण्याचे काय कारण होते?
भगवान श्रीकृष्णाने दोन कारणांमुळे द्रौपदीची लाज वाचवली. पहिले कारण द्रौपदी त्यांची सखी होती आणि दुसरे कारण की तिने दोन पुण्य कार्य केले होते.
पहिले पुण्य कार्य
एकदा द्रौपदी गंगेत स्नान करत असताना तिथे एक साधू स्नान करण्यासाठी आला होता. स्नान करताना साधूची लंगोट पाण्यात वाहून गेली आणि अश्या अवस्थेत तो बाहेर निघेल कसा म्हणून तो एका झाडामागे लपून गेला. द्रौपदीने त्याची ही अवस्था पाहता त्याला आपल्या साडीतून कापड फाडून दिले. आणि साधूने प्रसन्न होऊन द्रौपदीला आशीर्वाद दिला.
दुसरे कारण
एका कथाप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालचे वध केले होते तेव्हा कृष्णाचे बोट देखील कापले गेले होते. त्यातून रक्ताची धार वाहत असलेली पाहून द्रौपदीने आपली साडी फाडून त्यांच्या बोटावर बांधली होती. यानंतर श्रीकृष्णाने द्रौपदीला आशीर्वाद देत म्हटले होते की तुझ्या साडीची किंमत चुकवेन. द्रौपदीच्या या कर्मांमुळे कृष्णाने तिची लाज वाचवली.