गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘महाभारता’वर बी आर शेट्टीची तब्बल १००० कोटींची गुंतवणूक

‘महाभारता’वर येणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजामौली करणार नसून प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक वी ए श्रीकुमार मेनन करणार असल्याचे कळत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी संयुक्त अरब अमिराती मधील (यूएई) अरबपती बी आर शेट्टी तब्बल १००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती सोमोर आली आहे.
 
पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, २०२० च्या सुरुवातीला चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. दोन भागांत बनणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आल्यानंतर ९० दिवसांनी दुसरा भाग प्रदर्शित करण्यात येईल. चित्रपटाचे निर्माता बा आर शेट्टी म्हणाले की, हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगु आणि प्रमुख परदेशी भाषांमध्ये बनविला जाईल.अकॅडमी पुरस्कार विजेत्यांसह काही नामांकित कलाकारांचा या चित्रपटात समावेश करण्यात येणार आहे. भारतीय कलाकारांसह हॉलिवूडमधील काही चेहरेदेखील यात झळकणार असल्याचे म्हटले जातेय.