बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2024 (14:13 IST)

मिथुन चक्रवर्तीच्या रोड शो मध्ये झाली दगडफेक

पश्चिम बंगालमधील मिदनापूर शहरात अभिनेता पासून भाजप नेता बनलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या रोड शो दरम्यान अचानक काही लोकांनी दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिदनापूर लोकसभा सीट वर 25 मे ला मतदान होणार आहे. इथून भाजप उमेद्वार अग्निमित्रा पॉल यांनी तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांवर आरोप लावले आहे की, त्यांनी प्रचारादरम्यान कांचच्या बाटल्या आणि दगड फेकलेत. 
 
राज्याच्या सत्तारूढ पार्टीने आरोप फेटाळला आहे. तसेच या घटनेमध्ये मिथुन चक्रवर्ती आणि अग्निमित्रा पॉल यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. हा रोड शो कलेकट्टर ऑफिसपासून सुरु झाला आणि केरानीटोला कडे जात होता. ज्यामध्ये अनेक  भाजप समर्थक घोषणा देत होते. या दरम्यान अग्निमित्रा पॉल आणि मिथुन चक्रवर्ती सोबत एका गाडीमध्ये उभे होते. 
 
रोड शो शेखपुरा वळणावर आला तेव्हा रस्त्यावर उभे असलेल्या काही लोकांनी अचानक काचेच्या बाटल्या आणि दगड फेकण्यास सुरवात केली. एका पोलीस अधिकारींनी सांगितले की, स्थितीवर लागलीच नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच अग्निमित्रा पॉल म्हणाले की, भाजप प्रति समर्थन वाढल्याने टीएमसी घाबरली आहे. म्हणून या प्रकारच्या गुंडगर्दिचा आधार घेत आहे. ते मिथुन चक्रवर्ती यांच्या सारख्या महान नेत्याचा अपमान करण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला उतरू शकतात.