गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2017 (08:53 IST)

‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ चा टीझर रिलीज

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ या सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला झाला आहे. टीझरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या आयुष्याची एक झलक दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने सिनेमात हसीन पारकरची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा टीझर थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेला आहे, त्यामुळे आता सिनेमाविषयी प्रेक्षकांची अपेक्षा वाढली आहे.  1 मिनिट 5 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये, पती इब्राहिमच्या मृत्यूनंतर हसीनाचं आयुष्य कसं बदललं. त्या घटनेनंतर ती ‘नागपाड्याची गॉडमदर’ कशी बनली हे दाखविण्यात आलं आहे.टीझरच्या शेवटच्या सीनमध्ये हसीना कोर्टात उभी असून तिला नाव विचारलं जातं. यानंतर बॅकग्राऊंडमध्ये  ‘आपा याद रह गया ना! नाम याद रखने की ज़रूरत नहीं’, असा श्रद्धाचा दमदार डायलॉग ऐकायला मिळतो आहे.