रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (17:52 IST)

हॉलिवूडच्या 'या' चित्रपटावर आधारित असणार वरुणचा 'रणभूमी'

काही दिवसांपूर्वीच शशांक खेतान दिग्दर्शित 'धडक' हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा दोन नव्या चेहर्‍यांना घेऊन केलेल्या या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद ळिाला. अशातच शशांक खेतानचा आणखी एक नवा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून वरुण धवन आणि धडक फेम अभिनेत्री जान्हवी कपूर यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हॉलिवूडच्या 'मिशन इम्पॉसिबल' या चित्रपटावर आधारित हा चित्रपट असणार आहे. 'रणभूमी' हा चित्रपट टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल या गाजलेल्या अ‍ॅक्शन चित्रपटावरच आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार असून निर्मिती करण जोहरची असणार आहे. रंगभूमी हा एक अ‍ॅक्शन चित्रपट असून याचे बहुतेक शूटिंग विदेशात होणार असल्याचे म्हटले जात आहे. याआधी वरुणने शशांकसोबत 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटात काम केले आहे. 'रणभूी' एक रिवेंज ड्रामा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट 2020 ला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.