Marathi Biodata Maker

मरणोत्तर विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

शनिवार, 14 एप्रिल 2018 (10:56 IST)
बॉलीवुडमधील दिवगंत अभिनेता, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार विनोद खन्ना यांना चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपट जगतात भारतातील सर्वोच्च बहुमान असलेला हा मरणोत्तर पुरस्कार जाहीर त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
 
विनोद खन्ना यांनी बॉलीवुडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनय साकारला आहे. त्यांनी मेरे अपने, इंसाफ, परवरिश, मुकद्दर का सिकंदर, कुर्बानी, दयावान, मेरा गाव मेरा देश, चांदनी, द बर्निंग ट्रेन आणि अमर अकबर अँथोनी यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. विनोद खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या निर्णायक भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी नकारात्मक आणि चरित्र भूमिकाही सक्षमपणे पेलल्या आहेत. राजकारणात सक्रीय असतानाही त्यांनी चित्रपटसृष्टीत कार्यरत होते.
 
सुनिल दत्त यांच्या “मन का मीत’या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी 1968मध्ये पर्दापण केले. मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारण्यापूर्वी त्यांनी “आन मिलो सजना’,“पूरब और पश्‍चिम’आणि “सच्चा छूटा’सारख्या चित्रपटात सहाय्यक खलनायकच्या भूमिका केल्या होत्या. 1971मध्ये गुलजारद्वारा दिग्दर्शित “मेरे अपने’पासून त्यांची कारकिर्द बहरात आली. त्यानंतर त्यांनी “हेराफेरी’,“खून पसीना’,“अमर अकबर ऍथोनी’आणि “मुकद्दर का सिंकदर’यासारखी ब्लॉकबस्टर चित्रपट दिली.
 
2015 मध्ये प्रदर्शीत झालेला “एक थी रानी ऐसी भी’हा त्यांचा चित्रपट अखेरचा ठरला. दरम्यान, गतवर्षी 27 एप्रिल रोजी दिर्घ आजाराने त्यांचे मुंबईत निधन झाले होते. त्याप्रसंगी ते पंजाबमधील गुरुदासपुर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजग सरकारमध्येही ते केंद्रीय मंत्री होते.

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

सलमान खानच्या 'मातृभूमी'वर पुन्हा एकदा संकट, CBFC ने प्रमाणपत्र रोखले, ऑगस्टमधील प्रदर्शन पुढे ढकलले

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान ५ जुलै रोजी तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार

शाहरुख खानने इतिहास रचला, लॉस एंजेलिसमध्ये स्वतःचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधले

भगवान श्रीकृष्णाचे चमत्कारी मंदिर; रहस्यमयी निधीवन जिथे मंदिराचे दरवाजे आपोआप उघडतात आणि बंद होतात

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

पुढील लेख
Show comments