रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दिल्लीच्या मादाम तुसाँ मध्ये मधुबाला

नवी दिल्ली- येथील मेणाच्या पुतळ्यांच्या मादाम तुसाँ संग्रहालयात व्हीनस ऑफ इंडियन सिनेमा असे बिरूद असलेल्या सौंदर्यवती मधुबालाचा मेणाचा पुतळा उभा करण्यात आला आहे. मुघल-ए- आझम चित्रपटातील मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे या गाण्यातील तिच्या अदाकारीवर आधारित हा पुतळा आहे.
 
सोशल मीडियात या पुतळ्याचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. अतिशय सुंदर आणि हुबेहुब मधुबाला सारखाच हा पुतळा आहे. जुन्या जमान्यातील एखाद्या अभिनेत्रीचे आजही इतक्या मोठ्या संख्येने चाहते असण्याचे हे एकमेव उदाहरण आहे. 
 
पाश्चात्य देशांमध्ये जसे मर्लिन मन्रोचे दिवाने आजही आहेत, तसेच भारतात मधुबालाच्या सौंदयार्च चाहते आजही असंख्य आहेत.