1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (12:55 IST)

रणबीरने दीपिका समजून तिच्या आईशी केलं फ्लर्ट, डिलीट केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल

ye jawani hai dewaani
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आवडली. या दोघांनी एक चित्रपट खूप गाजला होता. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट अनेक तरुणांचा फेव्हरेट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट जुना असला तरी सध्या यामधील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 
 
या व्हिडीओत रणबीर कपूर दीपिकाच्या ऑनस्क्रीन आईशी बॉथरुमच्या बाहेर फ्लर्ट करताना दिसत आहे. या शॉटमध्ये रणबीर कपूरला वाटतं की बाथरुममध्ये दीपिका पदुकोण आहे आणि तो तिच्याशी फ्लर्ट करू लागतो. तेव्हा मागून दीपिका येते आणि रणबीरला आश्चर्यात पडत आणि तेवढ्यात तिची आई बाथरुममधून बाहेर येते. चित्रपटातील हे दृश्य एडिटिंगदरम्यान डिलीट करण्यात आले. मात्र युट्यूबवर हा व्हिडीओ सध्या खूप गाजतोय.
 
या चित्रपटात रणबीर आणि दीपिका या स्टार जोडीने मुख्य भूमिकेत धमाल भूमिका निभावली होती. या चित्रपटाचे गाणेही खूप गाजले होते.