शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Updated : रविवार, 11 सप्टेंबर 2022 (17:32 IST)

How To Choose Career: करिअर निवडण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात,करिअरची निवड कशी करावी जाणून घ्या

women career
करिअरची निवड ही कोणत्याही व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते कारण त्याचा थेट तुमच्या जीवनावर परिणाम होतो. जर तुम्ही योग्य करिअर निवडले तर तुमचा मार्ग सोपा होतो पण चुकीच्या निर्णयाचा तुमच्या आयुष्यावरही खोल परिणाम होतो. पण चांगले करिअर कसे निवडायचे याचे उत्तर सोपे नाही. करिअर निवडताना तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते,चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 आयुष्यात आनंद मिळवा -
करिअरची निवड करताना सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की हा निर्णय तुम्हाला आनंद देईल का? त्याचप्रमाणे करिअर निवडताना हे लक्षात ठेवा की, तुम्हाला आनंद देणारे करिअर तुम्ही निवडा. उदाहरणार्थ, कला क्षेत्राची निवड केल्याने तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही ते करिअर म्हणून निवडू शकता. कोणत्याही दबावाखाली कधीही करिअरची निवड करू नका.
 
2 तुमची कामाची शैली-
करिअर निवडताना तुमची कामाची शैली कशी आहे ते पहा. जर तुम्ही डेडलाईन पूर्ण करण्यात तज्ञ असाल तर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये तुमचे करिअर निवडू शकता परंतु जर तुम्हाला कोणतीही डेडलाइन किंवा कोणत्याही दबावाशिवाय काम करायचे असेल तर तुम्ही तुमचे करिअर म्हणून व्यवसाय क्षेत्राची निवड करू  शकता.
 
3- तुमचा प्राधान्यक्रम निवडा-
जेव्हा करिअरचा विचार केला जातो, तेव्हा सर्वप्रथम तुमच्या प्राधान्याची काळजी घ्या. लक्षात घ्या की तुम्हाला तुमचे उर्वरित आयुष्य एकच कार्य किंवा अनेक क्षेत्रे एक्सप्लोर करण्यात घालवायचे आहे. उदाहरणार्थ, पत्रकार होण्याचे प्राधान्य असल्यास  तर त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, तसेच जर सरकारी नोकरीत करिअर करायचे असेल तर त्यासाठीही तयारी ठेवा.
 
4- तज्ञांचा सल्ला घ्या
जर तुम्ही करिअरच्या निवडीमध्ये खूप गोंधळलेले असाल तर तुम्ही यासाठी तज्ञाचा सल्ला घेऊ शकता. हे तज्ञ तुमचे पालक, तुमचे शिक्षक किंवा तुमचे भाऊ -बहीण देखील असू शकतात. त्यांना तुमच्याबद्दल माहिती आहे आणि ते तुम्हाला चांगले करिअर निवडण्यासाठी चांगला सल्ला देऊ शकतात.