1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

एकच प्रकारची चटणी खाऊन कंटाळा आला ना, खा ही चविष्ट चटणी लिहून घ्या रेसिपी

अनेक घरांमध्ये रोजच्या जेवणात चटणी ही लागते. मग ती कोरडी असो किंवा ओली. पण नेहमी एकच प्रकारची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करा या फळापासून बनलेली चटणी, ते फळ आहे अननस. तर चला जाणून घेऊ या अननस पासून चटणी कशी बनवावी, लिहून घ्या रेसिपी 
 
साहित्य-
1/2 कप सिरका
1/2 कप साखर 
150 ग्रॅम अननस बारीक कापलेला 
1 टी स्पून आले 
अर्धा छोटा चमचा(वैकल्पिक) लसूण 
1/2 चमचा लिंबाचा रस 
1 लेमन ग्रास स्टॉक
1 दालचीनी स्टिक
1चक्रीफूल
2-3 मिरे पूड 
एक छोटा चमचा हिरवी कोथिंबीर 
दोन छोटे चमचे कांद्याचे काप 
 
कृती-
एक पॅनमध्ये सिरका आणि साखर मिक्स करावी. मग यामध्ये लैमन ग्रास घालावी, चक्रीफूल, दालचीनी, काफिर काडिपत्याची पाने, लिबचा रस, मिरे पूड, लसूण आणि आले घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा. जेव्हा हे मिश्रण शिजायला लागेल तेव्हा ते घट्ट होण्यास सुरवात होईल. तेव्हा यामध्ये अननसाचे पीस घालावे. परत एक मिनिट शिजवावे. मग बाऊलमध्ये काढून त्यावर कांद्याचे काप, कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपली अननसाची चटणी. तुम्ही पोळी, पराठा सोबत खाऊ शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik