गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जून 2018 (15:42 IST)

चविष्ट ‘बुंदी रायता’…

साहित्य :- दोन कप घट्ट व गोड दही, चार चमचे साय, दोन वाट्या बुंदी, अर्धी वाटी कोथिंबीर, 4-5 पुदिन्याची पाने, दोन-तीन हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
 
कृती :- दह्यामध्ये घोटलेली साय, कोथिंबीर, पुदिना-मिरचीचे वाटण, मीठ व साखर घालून फेटा. मोठ्या बाऊलमध्ये बुंदी घालून त्यावर तयार दही घाला. ढवळा व वरून चाट मसाला घाला. हे रायते आयत्यावेळी करावे. नाहीतर बुंदी मऊ पडते.