झणझणीत लाल मिरच्यांचे लोणचे
साहित्य: अर्धा किलो ताज्या लाल मिरच्या (पाव किलो मिरच्या वाटून घ्या व पाव किलो मिरच्या बारीक चिरा), 50 ग्रॅम लसणाची पेस्ट, 1 कप मोहरीचं तेल, पाव कप व्हिनेगर, आमचूर, साखर, मीठ, 50 ग्रॅम मोहरी पूड.
कृती : सर्वप्रथम तेल गरम करून धूर निघू द्या. लसूण व लाल मिरच्यांची पेस्ट घालून परता. अता त्यात चिरलेल्या मिरच्या घाला. व्हिनेगर, स्वादानुसार आमचूर, साखर, मोहरी पूड एकत्र कालवून घाला. शेवटी चवीनुसार मीठ घाला.