सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

आंबा रस बुंदी

साहित्य : 500 ग्रॅम आंबे, 500 ग्रॅम बेसन, 500 ग्रॅम तूप, 1 किलो साखर, 5-6 केशर काड्या, सुके मेवे. 
 
कृती : सर्वप्रथम आंब्याच्या फोडी करून मिक्सरमधून रस काढून घ्यावा. नंतर त्यात बेसन व केशर टाकून भज्यासारखा पातळ घोळ करावा. साखरेचा दोन तरी पाक करून घ्यावा. कढईत तूप गरम करून त्यावर चाळणी ठेवून बुंदी पाडावी व त्याला तळून घ्यावी. त्या बुंदीला पाकात 15-20 मिनिट ठेवून बाहेर काढून त्यात वेलची पूड व सुके मेव्याने सजवून सर्व्ह करावी.