Garlic Pickles Recipe : लसणाचे लोणचे जेवणाची चव वाढवतील रेसिपी जाणून घ्या
अनेकदा ती चव रोजच्या जेवणात नसते. त्यामुळे लोक चव वाढवण्यासाठी चटणी, रायता, लोणचे जेवणात खायला घेतात. लोणची जवळपास प्रत्येक घरात बनवतात. विशेषतः कैरीचे लोणचे आणि मिरचीचे लोणचे. पण याशिवाय अनेक गोष्टींचे लोणचेही बनवले जाते. जे खायला खूप चविष्ट असतात.लसणाचे लोणचे बनवले नसेल तर एकदा करून पहा. ते बनवणे फार सोपं आहे. तसेच, त्याची चव देखील अप्रतिम आहे. चला तर मग जाणून घेऊया लसणाचे लोणचे कसे बनवायचे. साहित्य आणि कृती जाणून घ्या.
साहित्य -
100 ग्राम लसणाच्या पाकळ्या, तीन चमचे मोहरीचे तेल, 1/4चमचे हळद, 2चमचे आमचूर पावडर, लाल तिखट, 1 वाटी बारीक चीरलेला गूळ, चवीनुसार मीठ.
मसाल्यांसाठी, एक चमचा मोहरी, 1/4 चमचा मेथीदाणे,1 चमचे जिरे, 1/4चमचे धणे, हिंग.
कृती -
लसणाचे लोणचे बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत मोहरीचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात लसूण आणि हळद घालून मंद आचेवर लसूण मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात आमसूल पावडर घालून मिक्स करा. चमच्याने ढवळत असताना दोन ते तीन मिनिट शिजू द्या. लसणात लाल तिखट, गूळ आणि मीठ एकत्र घाला.
ते शिजवा आणि गूळ वितळू द्या. जेणेकरून सर्व मसाले नीट मिसळून जातील. त्यात पावडर मसाले घालून मिक्स करावे. नीट शिजल्यानंतर गॅसवरून उतरवा. ते थंड होऊ द्या आणि काचेच्या बरणीत साठवा. हे लोणचे आठवडाभरानंतर खाण्यासाठी तयार होते.
Edited by - Priya Dixit