गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

आवळ्याचा मुरंबा

साहित्य : चांगले रसरशीत, दळदार आवळे १/२ किलो, साखर २ वाट्या, २-३ लवंगा, पाणी. 
 
कृती : प्रथम आवळे धुवून कोरडे पुसून घ्यावेत. कुकर मध्ये एका घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून ३-४ शिट्टया करून घ्याव्या. (पाण्याचा स्पर्श अजिबात होता कामा नये). गार झाल्यावर आवळे हाताने सोलून सुरीने लहान लहान फोडी करून घ्याव्या.
 
जाड बुडाच्या पातेलीत दोन वाट्या साखर घ्यावी. त्यात  १ ते सव्वा वाटी पाणी घालून साखर विरघळू द्यावी. नंतर पातेले गॅस वर ठेवून घट्ट सर एकतारी पाक करावा. तो थंड होत आल्यावर त्यात आवळ्याच्या फोडी टाकून ढवळावे व २ लवंगा स्वादासाठी घालाव्यात.
 
गार झाल्या वर स्वच्छ  काचेच्या बाटलीत भरून ठेवावा. थंडीत रोज सकाळी उठल्यावर चमचाभर मोरावळा खाणे प्रकृतीस पथ्यकर असते!