1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
  4. Spicy Sweet Kiwi Mango Mix Chutney Know Recipe

तिखट-गोड किवी आंबा मिक्स चटणी, जाणून घ्या रेसिपी

mango kivi
सध्या बाजारात आंबे मिळत आहे. तसेच किवी हे फळ देखील आपल्याला नेहमी बाजारात दिसते. पण तुम्हाला माहिती आहे का? किवी आणि आंबापासून स्वादिष्ट चटणी देखील तयार होते. तर चला लिहून घ्या रेसिपी किवी आणि आंब्याची तिखट-गोड चटणी. 
 
साहित्य-
चार आंबे 
दोन किवी 
एक कप साखर 
चवीनुसार मीठ 
अर्धा चमचा जिरे पूड 
एक चमचा तिखट 
 
कृती-
सर्वात आधी आंबे आणि किवी धुवून साल काढून घ्यावे. आता आंब्यामधील बी काढून तुकडे करून घ्या. किवीचे देखील बारीक तुकडे करून घ्या. आता एक डीप फ्राई पॅन घ्या त्यामध्ये कापलेले आंबे आणि किवी घालावे. आता साखर घालून झाकण ठेवावे. साखर पाक तयार होइसपर्यंत शिजू द्यावे. आता झाकण काढून मॅश करावे. आता या मध्ये मीठ, जिरे पूड, तिखट घालावे. हे चांगल्याप्रकारे मिक्स करून गॅस बंद करावा. थंड झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवावे. मग एयरटाइट कंटेनर मध्ये स्टोर करून ठेवल्यास एक महिन्यापर्यंत ही चटणी चांगली राहते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
पुढील लेख
तुम्हाला पावसाळ्यात भाजलेले कणीस खायला आवडते का? त्याचे 5 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या