- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - थोडं आंबट थोडं तिखट
आवळ्याची गोड चटणी
साहित्य : 250 ग्रॅम आवळे, 100 ग्रॅम गुळ किंवा साखर, दोन मोठे चमचे तेल, एक चमचा तिखट, एक चमचा धने पूड, हळद, मीठ, साखर, अर्धा चमचा जीरा, चिमुटभर हिंग, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या चवीनुसार.
कृती : आवळे उकळून त्यातील बी काढून घ्या. या आवळ्यात कोथिंबीर, मिरच्या, तिखट, धने पूड, मीठ, साखर, हिंग, जीरा व हळद टाकून मिक्सरमधून काढून घ्यावे. कढाईत तेल गरम करून त्यात हे सर्व मिश्रण टाकावे व चांगले परतावे. पुरी किंवा पराठा सोबत सर्व्ह करावे.