साहित्य : पांढरे तीळ दोन चमचे, दीड चमचा कच्चे तांदूळ, तीन चार लाल मिरच्या, थोडीशी चिंच आणि गूळ, चवीनुसार मीठ, पाव चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता, फोडणीसाठी तेल आणि अर्धा चमचा उडदाची पांढरी डाळ.
कृती : प्रथम एका वाटीत तांदूळ व तीळ घेऊन ते धुवून एका कपड्यावर पसरून सुकवावेत. कढईत तीळ व तांदूळ वेगवेगळे भाजून घ्यावेत. लाल मिरच्याही अर्धा चमचा तेल कढईत घालून भाजून घ्याव्यात. सर्व थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यावी. चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढून तो गाळून घ्यावा. एका कढईत तेल घालून मोहरी, उडदाची डाळ, कडीपत्ता व हिंग यांची फोडणी तयार करावी. त्यावर चिंचेचा कोळ घालावा. मीठ व गूळ घालून थोडे उकळावे. त्यानंतर तयार करून ठेवलेली पूड घालून मधून मधून हलवून चटणी थोडावेळ शिजवावी.