साहित्य : 250 ग्रॅम बोरं, एक चमचा साखर, एक लहान तुकडा गूळ, एक लहान चमचा शोप, 4-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1/2 लहान चमचा काळे मीठ, 1/2 लहान चमचा मीठ, 1/2 लहान चमचा तिखट, 1/2 इंच आलं बारीक किसलेला, 1/2 लहान चमचा धने पूड, 1/2 लहान चमचा गरम मसाला, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा ओवा व कोथिंबीर.
कृती : सर्वप्रथम बोरांना चांगल्याप्रमाणे धुऊन पुसून त्यातील बिया काढाव्या. नंतर सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घ्यावे. ह्या चटणीला पुरी किंवा परोठ्यासोबत सर्व्ह करावे.