स्वराज्यनिष्ठ "बाजी प्रभू देशपांडे"
लाख गेले तर चालेल, पण लाखाचा जाऊ नयेत!
१६१५ मध्ये शिंद, भोर (महाराष्ट्र) येथे बाजी प्रभू देशपांडे यांचा जन्म झाला होता. चंद्रसेनीय कायस्थ प्रभू (ब्राह्मण परिवार) येथे जन्मले बाजी प्रभू देशपांडे एक वीर योद्धा होते. २०-२० तास कार्य करायचे कौशल ठेवायचे बाजी प्रभू. रामजींसाठी जसे हनुमान होते तसे शिवबांसाठी बाजी प्रभू होते. मराठा इतिहासात यांचा योगदान अविस्मरणीय आहे. राष्ट्र भक्ती आणि आपले शिवबांसाठी प्राण देण्यापूर्वी त्यांनी एकदाही विचार केला नाही आणि आपले कर्तव्य पूर्ण केले.
बाजी प्रभू यांनी पावनखिंडच्या (घोड खिंड) युद्धात आपले प्राण गमावून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणाचे रक्षण केले.
जुलै १६६०, पन्हाळाच्या किल्ल्यात जिथे शिवबा रहात होते तिथे आदिलशाही जनरल सिद्धी जोहर यांनी वेढा घातला. शिवरायांना सुरक्षित विशालगड पोहोचवायला शिवबा आणि बाजी प्रभू यांनी मंत्रणा केली. त्यांनी सिद्धी जोहरला आत्मसमर्पण करायची माहिती दिली. सिद्धी जोहरचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्यामधूनच एक शिवा काशीद यांना शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत पाठवण्यात आले. सिद्धी जोहर हे लक्षात येईपर्यंत की शिबांचा रूप धरून शिवा काशीद यांना पाठवले आहे तोपर्यंत शिवबा, बाजी प्रभू आणि त्यांचासोबत ६०० सैनिक वेगळ्या मार्गाने निघाले.
जोहरच्या डोळ्यात धूळ उडवण्याचा हा प्रयास जास्त वेळ टिकला नाही. हे प्रकरण समजल्यावर त्याने शिवा काशिदला मारले. शिवा काशीद ह्यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन आपला योगदान दिला. पण आता सिद्धी जोहर हा रागात आल्याने त्याने शिवबांवर आक्रमणसाठी सिद्धी मसूद ह्याला पाठवला.
जोहरने सिद्धी मसूदला पाठवल्याची माहिती मिळताच बाजी प्रभू यांनी शिवरायांना पुढे प्रस्थान करायचा आग्रह केला, पण शिवराया इथे सहमत नव्हते. त्यांनी बाजी प्रभूंचा साथ देण्याची गोष्टी केली पण बाजू प्रभूंनी त्यांना स्वराज्याला हवी त्यांची गरज समजावून तेथून जाण्यासाठी राजी केले. शिवबा निघताना बाजी प्रभूंना म्हणाले की 'आम्ही विशालगड पोहोचून ३ तोफेचे गोळे सोडू आणि हा संदेश मिळताच तुम्ही पण विशालगडला निघा'. इतकं सांगून शिवबा विशाळगडसाठी निघाले.
६०० सैनिकांचे दलामधून ३०० शिवबांसोबत विशालगडला निघाले आणि इकडे शूरवीर बाजी प्रभू ३०० मराठा सैनिकांबरोबर सिद्धीचे १०००० सैनिकांशी युद्ध करायला उभे होते. युद्ध घोड खिंडात (पावन खिंड) सुरु झाले आणि ३०० वीर मराठा सैनिकांनी सिंह गर्जनाकरून सिद्धीच्या सैनिकांवर हल्ला केला. शरीराचा कोणताही अवयव असा नव्हता जिथे बाजी प्रभुंना जखम झाली नसावी पण त्यांना कसलाही भान नव्हता. केवळ महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. इकडे विशालडागवर सरदार सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी यांचा अधिपत्य होता. युद्धानंतर आणि संघर्षानंतर शिवबा विशालगड पोहोचले. तोपर्यंत प्रभू प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर त्यांनी प्राण सोडले. ही घटना १३ जुलै १६६० रोजी घडली.
१८ तास निरंतर युद्ध करत बाजी प्रभू मातृभूमीला समर्पित होऊन गेले. आपले रायांची सुरक्षेसाठी बाजी प्रभू आणि शिवा काशीद यांनी स्वतःचे प्राण गमावले आणि इतिहासात अमर झाले.
यांच्या मृत्यूनंतर घोड खिंड ह्याचे नाव बदलून पावन खिंड केले गेले कारण बाजी प्रभू आणि त्यांच्यासारखे अखंड योद्धेच्या बलिदानाने ती भूमी पावन होऊन गेली होती.