गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (05:00 IST)

छत्रपती शिवरायांचे बालपण

छत्रपती शहाजी राजे भोंसले हे मालोजीराजे ह्यांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजीराजे ह्यांचे वडील होते. छत्रपती शहाजी राजे हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन आणि स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुणांना शिवबा मध्ये रोपणारे होते. 
छत्रपती शहाजी राजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. निजामाच्या वजिरांच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहान ने विजापूर आपल्या ताब्यात घेतल्यावर छत्रपती शहाजी राजे ह्यांना आदिलशाहच्या पदरी सरदार बनविण्यात आले आणि आदिलशाहने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. छत्रपती शहाजीराजांनी तुकाबाईंशी दुसरे लग्न केले. 
लहानग्या शिवरायांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. शिवरायांची वयाची सहा वर्षे खूप धावपळीची गेली. या दरम्यान जिजाऊ ह्यांनी छत्रपती शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. दिवसभर शिवराय आपल्या सवंगडी सह खेळायचे, मोकळे रानात फिरायचे, कुस्ती खेळायचे, लाठी चालवणे, तलवारबाजी करणे हे सर्व करायचे.
दिवसभर खेळून दमले की संध्याकाळी जिजाऊ सांजवात करायचा आणि त्यांना जवळ घेऊन रामाच्या, कृष्णाच्या, अभिमन्यूच्या तर कधी भीमाच्या गोष्टी सांगायचा. तर कधी नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्वरीतील अभंग म्हणायचा. कधी त्या शूरवंताच्या गोष्टी सांगायचा. तर कधी साधुसंतांच्या विषयी सांगायचा. जेणे करून त्यांच्या मनात त्यांच्या प्रति आदर बनून राहावं.
शिवरायांचे सवंगडी गरीब मावळ्यांची मुले होती. शिवराय त्यांच्या कडे जाऊन खेळायचे. ते त्यांच्या सह मातीचा किल्ला बनवायचे, मातीचे हत्ती घोडे बनवायचे, लपंडाव खेळायचे, भोवरा फिरवायचे. मावळ्यांची मुले रानात वाढणारे होते त्यामुळे ते पक्ष्यांची आवाज हूबेहूब काढायचे. शिवरायांचे बालपण त्यांच्या सवंगडींसह आनंदात जात होते.