गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Updated : सोमवार, 6 जून 2022 (10:23 IST)

shiv rajyabhishek quotes in marathi छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा संदेश

shivaji
shiv rajyabhishek quotes in marathi
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा संदेश 
1 स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज 'छत्रपती'
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 
2 शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट
रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट
डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
3 न भूतो न भविष्यति असा होता 
आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा
या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी 
शिवभक्त झाले होते गोळा
या ऐतिहासिक दिनाच्या एकमेकांस शुभेच्छा देऊन
शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा!
 
 
4  प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
 
 
5  मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास
ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती
पोवाडे, गौरव गीतांमधून
आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती  
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 
6 होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
 
 
7  झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही. !
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा..!
 
 
8  हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं..!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
 
9  मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
 
10  सूर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता..
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.