सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2023
  3. छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023
Written By

छत्तीसगडमध्ये भाजपने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

Chhatisgarh BJP last list of candidates छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी 4 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. राज्यातील एकूण 90 विधानसभा जागांसाठी 86 उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे.
 
पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार राजेश अग्रवाल यांना अंबिकापूरमधून, सुशांत शुक्ला यांना बेलतरा, धनीराम धिवार यांना कसडोल आणि दीपेश साहू यांना बेमेटरामधून उमेदवारी देण्यात आली आहे.
 
राज्यातील सत्ताधारी पक्ष काँग्रेसने सर्व 90 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दोन्ही पक्षांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर आता राज्यात निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे.
 
राज्यात 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे, हे विशेष. मतमोजणीनंतर 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.