उन्हाळ्यात प्रमाणाबाहेर घाम आल्यावर ताबडतोब थंड ठिकाणी, झाडाखाली अथवा हवेशीर ठिकाणी जावं, वातानुकूल वातावरण तर फारच उत्तम. शिवाय बरं वाटेपर्यंत मीठ घातलेलं थंडपेय घ्यावं. लिंबूपाणी, सरबत, नारळपाणी तर उत्तमच.