शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By
Last Modified: बुधवार, 21 एप्रिल 2021 (10:47 IST)

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल

मुलांनी प्रगती करावी अशी इच्छा सर्व पालकांना असते अशात त्याच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण योग्य आहारामुळे मेंदू वेगानं काम करतं. तर मेंदूची शक्ती वाढवायची असेल तर मुलांना दररोज हे पदार्थ खाऊ घाला-
 
ड्रायफ्रूटस
सुक्या मेव्यांमध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असल्याने शरीराला सर्व आवश्यक घटक मिळतात. याने मेंदूचा विकास होतो. ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने ताकद ‍मिळते, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मदत होते. अक्रोडला तर ब्रेन फूड असेही म्हणतात. 
 
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट खाल्ल्याने ताण कमी होतं ज्याने मेंदूवर चांगला परिणाम होतो. चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आढळतं. तसंच डार्क चॉकलेटमुळे मूड सुधारतं आणि एक्रागता वाढते.
 
ऑलिव्ह ऑइल
जेवण्यात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करावा. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, के, खनिजे व अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. हे मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य आहे. याने स्मरणशक्ती सुधारते. ऑलिव्ह ऑइलने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
 
अंडी आणि मासे
अंडीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम इतर आवश्यक घटक असल्यामुळे मेंदूच्या पेशी विकसित होतात. तसंच फिशमध्ये ओमेगा ३ आढळ्यामुळे मेंदूच्या पेशींचा विकास चांगला होतो.