सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (09:16 IST)

मुंबईत कोरोनाचे 1377 नवीन प्रकरण

मुंबईत ख्रिसमसच्या काळात जुहू बीचसह अनेक भागात प्रचंड गर्दी असताना हे नवे कोरोना रुग्ण मुंबईत सापडले आहेत. मात्र, मुंबईत काही प्रमाणात वाढ झाली  आहे. मुंबईत 1377 नवीन  रुग्ण आढळले आहेत. मुंबईत 216 दिवसानंतर ची सर्वात अधिक रुग्णसंख्या असल्याने चिंतादायक बाब आहे. 
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतही, बीएमसीने नववर्ष साजरे करण्यास, सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या, हॉटेल्स-रेस्टॉरंट्स, बार, क्लब तसेच सोसायटी इमारतींमध्ये कोणत्याही प्रकारच्या सामूहिक मेळाव्यावर बंदी घातली आहे.  राजधानीत सक्रिय रुग्णांची संख्या 4765 वर गेली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे एकूण 7,71921 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोविडमुळे एकूण 16373 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.