संबंधित माहिती
- एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात झाला मोठा निर्णय
- भूलतज्ज्ञांसाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद
- शिन्देगटातील संभाव्य खासदारांच्या घराला आणि कार्यालयाला सुरक्षा कवच दिले
- कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई द्या- सर्वोच्च न्यायालय
- Coronavirus Survives on Surfaces for a month कोरोना विषाणू यावर महिनाभर जगू शकतो, पुन्हा संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो
राज्यात गुरुवारी कोरोनाचे २ हजार २८९ नवे रुग्ण
राज्यात गुरुवारी कोरोनाचे २ हजार २८९ नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारांवरच अडकला आहे. तर, २४०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७८ लाख ६४ हजार ८३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गुरुवारी सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे. कालही पुण्यात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर, दुसरीकडे राज्यात सहा कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्के झाला आहे. तसंच, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९७ टक्के आहे.
राज्यात सध्या १४ हजार ५१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर, पुण्यात ५ हजार १२५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तसेच, १९३७ रुग्णांवर मुंबईत उपचार सुरू आहेत.
