मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:18 IST)

राज्यात 3 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद

corona
काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्यामध्ये घट पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा आलेख घसरता दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी 3 हजार 502 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 9 हजार 815 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात सध्या 45 हजार 905 ॲक्टिव रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 76,49,669 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात  218 नवीन ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. आज आढलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबई 172, पुणे मनपामध्ये 30, गडचिरोलीमध्ये 12 आणि पुणे ग्रामीणमध्ये चार रुग्णांची नोंद झाली आहे.