मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (10:44 IST)

राज्यात कोरोना विषाणूची 5609 नवीन प्रकरणे, आणखी 137 मृत्यू

मंगळवारी राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 5,609 नवीन रुग्णांची पुष्टी झाली आणि 137 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. पुणे विभागात सर्वाधिक 46 मृत्यू झाले आहेत.राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की आज 7,568 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत.ते म्हणाले की महाराष्ट्रातील एकूण प्रकरणे 63,63,442 वर गेली आहे. तर मृतांची संख्या 1,34,201 वर पोहोचली आहे.संक्रमणापासून मुक्त झालेल्या लोकांची संख्या 61,59,676 झाली आहे.
 
अधिकाऱ्याच्या मते, राज्यात संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 66,123 वर आली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी नवीन प्रकरणांची संख्या 1,104 ने वाढली, तर एक दिवसापूर्वी 68 मृत्यू झाले आणि आज 137 संक्रमित लोकांनी आपला जीव गमावला आहे. महाराष्ट्रात संसर्गमुक्त होण्याचा दर 96.8 टक्के आहे तर मृत्यू दर 2.01 टक्के आहे. धुळे, नंदुरबार,वाशिम,वर्धा,भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये आणि मालेगाव आणि परभणी नगरपालिकांमध्ये कोविडची कोणतीही नवीन प्रकरणे आढळली नाहीत,असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
राज्यातील सातारा जिल्ह्यात जास्तीत जास्त 782 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राच्या आठ भागांपैकी पुणे विभागात सर्वाधिक 2,230 नवीन प्रकरणे आहेत, त्यानंतर कोल्हापूरमध्ये 1,413 नवीन पुष्टी झालेल्या प्रकरणांची नोंद झाली आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, इतर भागांमध्ये, मुंबई विभागात 707, नाशिक विभागात 683, लातूर विभागात 398, औरंगाबाद विभागात 33,अकोला विभागात 31 आणि नागपूर विभागात 14 प्रकरणे नोंदली गेली आहेत.
 
अधिकारी म्हणाले की,राज्यातील पुणे विभागात सर्वाधिक 46 जणांचा मृत्यू झाला आहे.यानंतर कोल्हापुरात 43 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला.मुंबई परिसरात कोविडमुळे 19 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई शहरात 239 नवीन प्रकरणे आणि पाच मृत्यूंची नोंद झाली तर पुणे शहरात 247 संक्रमित आणि पाच रुग्णांचा मृत्यू झाला.