संबंधित माहिती
- Tokyo Olympics 2020:तिरंदाज प्रवीण जाधवने आपल्या पहिल्या सामन्यात 6-0 ने विजय नोंदविला
- उत्तम आरोग्याची 6 सुत्रे !
- सोन्याच्या वायद्याच्या किंमतीत किंचित घट,चांदी 67 हजार खाली
- राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून १६ हजार कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचं किट वाटणार
- महाराष्ट्रात पूर आणि दरड कोसळल्यामुळे 164 ठार,अनेक बेपत्ता
राज्यात 6,857 नवे रुग्ण, 6,105 जणांना डिस्चार्ज
महाराष्ट्रात बुधवारी 6 हजार 857 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 6 हजार 105 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्या 82 हजार 545 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 लाख 82 हजार 914 एवढी झाली आहे. त्यापैकी 60 लाख 64 हजार 856 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात 286 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 32 हजार 145 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे. रिकव्हरी रेट 96.53 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 73 लाख 69 हजार 757 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 88 हजार 537 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 364 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
