शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (08:47 IST)

राज्यात गेल्या 24 तासात 7,568 ‘कोरोना’मुक्त, 4,505 नवीन रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून 6 हजारांच्या खाली आला आहे.राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सोमवारी घट झाली आहे.बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे.एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत असताना दुसरीकडे मृत्यूंचा आकडा कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
 
राज्यात सोमवारी 4,505 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7,568 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 61 लाख 51 हजार 956 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.76 टक्के आहे. तसेच  68 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 68 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 1 लाख 34 हजार 064 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 97 लाख 25 हजार 694 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 57 हजार 833 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 4 लाख 21 हजार 683 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 2,895 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.