1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (15:11 IST)

अहमदनगर प्रथमच सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण…

नगर शहर व जिल्ह्यात तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वाधिक ११५ पॉझिटिव्ह रुग्ण हे बुधवारी आढळून आले आहेत. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून १०० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते.विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी सर्वाधिक रुग्ण संख्या वाढत असलेल्या राज्यातील पाच जिल्ह्यात नगर जिल्हा होता. नगर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत घट होऊ लागली होती.
आतापर्यंत तीन महिन्यात शंभरपेक्षा कमी रुग्ण दररोज आढळून येत होते. बुधवारी मात्र जिल्ह्यात नवे ११५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात बुधवारी ६२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५१ हजार ७४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८९ टक्के इतके झाले आहे.दरम्यान उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४३३ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५२ आणि अँटीजेन चाचणीत १६ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये मनपा ४, अकोले ६, नगर तालुका ५, पारनेर ५ जणांचा समावेश आहे.