बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (16:54 IST)

भारतात ओमायक्रॉन बाधित रुग्णाचा मृत्यू

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंट जरी घातक मानला जात नसला तरी झपाट्याने परसणाऱ्याओमायक्रॉन मुळे राजस्थानात एक 73 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जयपूर मध्ये हा रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला होता. नंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. नंतर त्याची चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु त्याला ओमायक्रॉनची लागण लागली होती. नंतर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे हा मृत्यू ओमायक्रॉन मुळे झालेला असे म्हटले जाईल. असे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले 
सध्या भारतात दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. सध्या देशात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2135 वर गेली आहे. सध्या महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळ येथे ओमायक्रॉन चे सर्वाधिक रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून  दोन लाख चौदा हजार चार झाली आहे. एका दिवसात कोरोनाची 58 हजार 97 नवीन प्रकरणे नोंदली गेली  तर 15 हजार 389 रुग्ण बरे झाले. सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखाच्या पुढे आहे.