बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (08:14 IST)

राज्यात ४,७५७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असून ते ९३.०८ टक्क्यांवर पोहोचलं आहे. दरम्यान, रविवारी ४,७५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात ४,७५७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ७,४८६ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आता एकूण १७,२३,३७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे.
 
दरम्यान, राज्यात सध्या एकूण ८०,०७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.०८ टक्के झालं आहे.
 
पुण्यात एकाच दिवसभरात ३०९ रुग्ण आढळले, सात जणांचा मृत्यू
 
पुणे शहरात रविवारी ३०९ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर आतापर्यत  १ लाख ७२ हजार २८ इतकी संख्या झाली आहे. दरम्यान, सात रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे एकूण ४ हजार ४९३ मृत्यू झाले आहेत. तर ४४४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे १ लाख ६२ हजार ४२३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.