रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (09:39 IST)

राज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण दाखल

राज्यात बुधवारी ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर १११ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५८% एवढा आहे.  तसेच ५०२७ नवे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६९५२०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५२% एवढा झाला आहे. 
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १०९८९४९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८३२१७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५४७७९१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६०७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १४९१२ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १५४५७ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा २०४२५ इतका आहे.