शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (09:03 IST)

राज्यात सध्या ५४,५३७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, नव्या ३,०१८ रुग्णांची भर

राज्यात मंगळवारी ३,०१८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९,२५,०६६ झाली आहे. राज्यात ५४,५३७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ६८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,३७३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे.
 
राज्यात मंगळवारी ६८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ६, नाशिक ३, जळगाव ३, पुणे ९, पिंपरी चिंचवड मनपा ५, सोलापूर ६, सातारा ४, परभणी ५, अमरावती ३ आणि नागपूर ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ६८ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू पुणे ६, अमरावती ३, परभणी २, औरंगाबाद १ आणि रत्नागिरी १ असे आहेत.
 
तर ५,५७२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १८,२०,०२१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५४ टक्के एवढे झाले आहे.  तपासलेल्या १,२६,००,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२५,०६६ (१५.२८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८९,५६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,२०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.