शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (21:48 IST)

मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा विस्फोट, 82 विद्यार्थ्यांना कोरोना

गलीमध्ये मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या 82 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 78 विद्यार्थिनी आणि 4 विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
कोरोनाची बाधा झालेले 82 विद्यार्थी हे MBBS शिकणारे असल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी 35 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या होत्या. आता नवीन 47 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
 
महाविद्यालयातील 60 विद्यार्थ्यांचा स्वॅब पाठवण्यात आला होता. धक्कादायक आणि काहीशी चिंताजनक बाब अशी की, पॉझिटिव्ह आलेले या 35 विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.